शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या

शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या

Gadchiroli crime update

गडचिरोली - शिवसेना ठाकरे गटाच्या कुरखेडा युवतीसेना शहर प्रमुख राहता सय्यद यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.


गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरातील राहता या शिवसेना ठाकरे गटाच्या युवतीसेना शहर प्रमुख होत्या, नवऱ्याने चाकूने भोसकून त्यांची हत्या केली.

Thackeray group shivsena


गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास राहता चा पती नजद गुलाब सय्यद याने चारित्र्याच्या संशयावरून राहता यांची हत्या करीत पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.


राहता चा पती नजद हा आधी मुंबई येथे फुटपाथवर साहित्य विक्री करायचा, लग्नानंतर तो आपल्या सासुरवाडीत रहायला आला, राहता व तिचा पती आणि 2 मुले वडिलांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर राहत होत्या.


नजद हा नेहमी राहताच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण करीत होता, विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी नजद हा छत्तीसगड येथे हरणाच्या शिंग विक्री प्रकरणातून जामिनावर सुटला होता.


ज्यादिवशी हे हत्याकांड घडले तेव्हा राहता ची 2 मुले उपस्थित होती, राहताच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने ते रुग्णालयात होते, रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाल्यावर ते घरी परतले असता घाबरलेल्या मुलांनी आजोबा ला घडलेला सर्व प्रसंग सांगितला, तात्काळ ते घरच्या वरील मजल्यावर गेले असता त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात राहता चा मृतदेह पडला होता.


राहता ची हत्या केल्यावर नजद ने रक्ताने माखलेले कपडे नदीवर जाऊन धुतले, त्यानंतर अंघोळ करीत तो पोलीस स्टेशनमध्ये गेला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने