India crime news
मध्यप्रदेश - ग्वालेर जिल्ह्यातील थाटीपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान मुलाने आईला प्रियकराच्या बाहुपाशात बघितले त्यानंतर आता आपले पितळ उघडे पडणार या भीतीने आईने आपल्या मुलाला गच्चीवरून खाली फेकले या घटनेत मुलाचा मृत्यू झाला मात्र त्यानंतर तो निष्पाप मुलगा आईच्या स्वप्नात यायला लागल्याने आईने आपला गुन्हा कबूल केला.
तारामाई कॉलॉनीत राहणारे ध्यानसिंह यांचा विवाह वर्ष 2017 मध्ये भिंड येथील ज्योती यांच्यासोबत झाला होता, ध्यान सिंह हे पोलीस दलात कार्यरत होते.
लग्नानंतर ध्यानसिंह व ज्योती यांना 2 मुले झाली, मात्र त्यानंतर ज्योती यांचे प्रेमसंबंध शेजारी राहणाऱ्या उदय या युवकासोबत जुडले.
28 एप्रिल 2023 ला सकाळी ध्यानसिंह यांच्या घरी घरगुती कार्यक्रम होता, घरी नातेवाईकांची वर्दळ होती, सायंकाळी कार्यक्रमाची घाई असताना ज्योती प्रियकर उदय याला भेटण्यासाठी गच्चीवर गेली, त्यावेळी ज्योती चा मुलगा आईच्या मागे गच्चीवर गेला, ज्योती गच्चीवर उदय च्या बाहुपाशात असल्याचे जतीन ला दिसले, आता आपलं प्रेमप्रकरण सर्वाना माहीत होणार या भीतीने ज्योतीने लहान निष्पाप मुलाला गच्चीवरून खाली फेकले.
या घटनेत जतीनचा मृत्यू झाला, आधी सर्वाना हा अपघात वाटला होता, मात्र घटनेच्या काही दिवसांनी ज्योतीच्या स्वप्नात जतीन चा निष्पाप चेहरा दिसू लागला, आपण जतीन ला मारायला नव्हतं पाहिजे असा विचार तिच्या मनात येऊ लागला होता, मुलगा गेल्याचा धक्का पत्नीला बसला असे ध्यानसिंह ला नेहमी वाटायचे.
मात्र एक दिवस ज्योती ने रडत रडत ध्यानसिंह ला प्रेम संबंधामुळे जतीन ला मी गच्चीवरुन खाली फेकले मला माफ करा म्हणत आपला गुन्हा कबूल केला, ध्यानसिंह ने याबाबत पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध फिर्याद दिली.
ध्यानसिंह यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्योती ला मुलाच्या हत्याप्रकरणात अटक केली.