Bomb चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील गजबजलेल्या भगवती व्यापार संकुल समोर 3.30 वाजताच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या बॉम्ब स्कॉड पथक गडचांदूर येथे दाखल झाले आहे, सध्या त्या वस्तूची तपासणी करण्यात येत आहे, आज बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची गर्दी उसळली होती, भगवती व्यापार संकुल समोर एका पिशवीमध्ये ती बॉम्ब सदृश वस्तू आहे, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे सुद्धा घटनस्थळी दाखल झाले आहे.