Local crime branch : गुन्हा घडण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने तलवार केली जप्त

Local crime branch : गुन्हा घडण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने तलवार केली जप्त

 Local crime Branch चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी पोलिसांना आवाहन देण्याचे काम करीत आहे, मात्र स्थानिक गुन्हे शाखा यावर कारवाई करण्याचे अतोनात प्रयत्न करीत आहे.

Local crime branch


हत्या, अवैध शस्त्र, गोळीबार, अग्निशस्त्र या माध्यमातून गुन्हे जिल्ह्यात घडत आहे, काही प्रकरण गुन्हे घडल्यावर पुढे येतात तर काही गुन्हे घडण्यापूर्वी असेच एक प्रकरण चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले आहे.

Local crime branch 28 ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की एका युवकाने राहत्या घरी लोखंडी तलवार लपवून ठेवली आहे.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजीव गांधी वार्ड, रयतवारी कॉलरी येथे धाड मारली, या धाडीत पोलिसांना एक लोखंडी धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी 22 वर्षीय राहुल उर्फ अजय गिरीधर मादणकर याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक करीत त्याला पुढील तपासासाठी रामनगर पोलिसांच्या हवाली केले.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विनोद भूरले, नितेश महात्मे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल घारघाटे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने