Gang rape : चंद्रपूर जिल्ह्यात मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्याचार

Gang rape : चंद्रपूर जिल्ह्यात मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्याचार

 Gang rape राज्यात महिला अत्याचाऱ्याच्या घटनेत वाढ होत असून बदलापूर, अकोला व अमरावती जिल्ह्यात महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले, मात्र काही प्रकरणी पोलीस प्रशासनाने प्रकरण व्यवस्थित हाताळले नसल्याने बदलापूर येथे नागरिकांचा उद्रेक वाढला. आता महिला अत्याचाराचा किळसवाणा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे उघडकीस आला आहे, 5 जणांनी मिळून मनोरुग्ण महिलेवर सामूहिक बलात्कार करीत त्याची चित्रफीत बनवीत समाजमाध्यमांवर व्हायरल केली.

Gang rape in nagbhid


ही घटना १२ ऑगस्ट २०२४ च्या मध्यरात्रीची आहे. पिडित महिला एकटी असल्याचे पाहून तिला आरोपींनी बसस्थानकातील प्रसाधनगृहात नेले आणि बळजबरीने अत्याचार केला. हा अत्याचार सुरू असतानाच दुसऱ्याने चित्रीकरण केले. आणि चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत यातील एका आरोपीने मित्राला चित्रफीत पाठविली. या मित्राने ही चित्रफीत समाज माध्यमावर वायरल केली आणि शहरात एकच खळबळ माजली.

बलात्कार - घुग्गुस येथे वयोवृद्ध महिलेवर युवकाने केला बलात्कार

Gang rape यासंदर्भात येथील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत शुक्रवारी उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांना निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. चित्रफीतीत दिसणाऱ्या आरोपींचा आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून काही तासात पाच आरोपींना अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (२), (क), ७०(१) ८७, १२६(२), ३ (५) सहकलम ६७,(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 


दरम्यान पोलिसांनी पिडित महिलेचा शोध घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे पाठवले. दरम्यान पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी नागभीड येथे भेट दिली असून तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार काचोरे करीत आहेत.

विशेष बाब म्हणजे चंद्रपूर मध्ये बदलापूर सारखी परिस्थिती उदभवू नये यासाठी पोलिसांनी आरोपीची नावे गोपनीय ठेवली आहे, आरोपी बाबत पोलीस माहिती द्यायला तयार नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने