Chandrapur firing case : अमन अंदेवार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

Chandrapur firing case : अमन अंदेवार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

 Chandrapur firing case मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर भरदिवसा शहरातील रघुवंशी कॉम्पलेक्स येथे गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तरप्रदेशातील चित्रकुट येथून अटक करण्यात चंद्रपूर शहर पोलिसांना यश आले. घनश्याम मिश्रा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अन्य दोघांना यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून मिश्रा हा फरार होता.

Mns aman andewar


चंद्रपूर जिल्ह्यात मनोरुग्ण महिलेवर सामूहिक बलात्कार

शहरातील रघुवंशी कॉम्पलेक्स येथे अमन अंदेवार यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. दुपारच्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टजवळ असताना अंदेवार यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात अंदेवार यांच्या पाठिला गोळी लागल्याने तो जखमी झाले. त्यांला तातडीने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची पोलिस विभागाने गंभीर दखल घेतली. तपासात तीन आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून दोघांना ताब्यात घेतले. यातील एक जण कोरपना येथील, तर दुसरा मोरवा येथील रहिवासी आहे. मात्र, मुख्य आरोपी हा उत्तरप्रदेशात पळून जाण्यात यशस्वी झाला. 


तेव्हापासून पोलिसांचे पथक मुख्य आरोपी घनश्याम मिश्रा यांच्या मागावर होते. अखेर, मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तरप्रदेशातील चित्रकुट येथून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे गोळीबाराची घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा उलगडा आता होणार आहे. सदरची यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस पथकाने केली.

घटना काय?

4 जुलै 2024 ला शहरातील गजबजलेले प्रसिद्ध व्यावसायिक संकुल येथे दुपारच्या सुमारास मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात जात होते, त्यावेळी ते मोबाईल वर बोलत होते, काही वेळाने ते लिफ्ट जवळ आले असता एक अज्ञात इसम ज्याने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता, त्याने बॅग मधून बंदूक काढत अंदेवार यांच्यावर गोळी झाडून निघून गेला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने