Battery thief : रामनगर पोलिसांनी बॅटरी चोरणाऱ्या टोळक्याला केली अटक

Battery thief : रामनगर पोलिसांनी बॅटरी चोरणाऱ्या टोळक्याला केली अटक

Battery thief चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक ची बॅटरी चोरणार्या टोळक्याला पोलिसांनी अटक करीत 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी 3 आरोपीना अटक करण्यात आली आहे.

Battery thief


Battery thief 25 ऑगस्टला बाबूपेठ बाबा नगर येथे राहणारे वाहन चालक गुरुदास बोरकर यांनी आपले आयसर वाहन रात्री 9 वाजताच्या सुमारास नायरा पेट्रोल पंप येथे पार्क केले, सकाळी ते ट्रक मधील सामान चेक करण्याकरिता गेले असता त्यांना वाहनात बॅटरी आढळून आली नाही, बोरकर यांनी आजूबाजूला बॅटरी चोरी बाबत विचारणा केली असता त्याठिकाणी पुन्हा एका वाहनाची बॅटरी चोरी झाली अशी बाब पुढे आली, 26 ऑगस्टला बोरकर यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद नोंदविली.

अवश्य वाचा :मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

 Battery thief घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी 19 वर्षीय मंथन संतोष दारूनकर रा. बाबा नगर,बाबूपेठ, 21 वर्षीय आयुष विजय खोब्रागडे, रा. तुलसीनगर, 23 वर्षीय चिन्मय कैलास रामटेके, रा वडगाव यांना अटक करण्यात आली.

आरोपिकडून चोरी गेलेल्या वाहनातील बॅटरी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीनी याआधी असा गुन्हा केला का, याबाबत चौकशी केली असता आरोपी जवळून वेगवेगळ्या कंपनीचे 14 नग बॅटरी किंमत 70 हजार असा एकूण 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक असिफ रजा शेख, गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, पोउपनी मधुकर सामलवार, पोउपनी दीपेश ठाकरे, पेतरस सिडाम, शरद कुडे, लालू यादव, हिरालाल गुप्ता, प्रशांत शेंद्रे, संदीप कामडी, मनीषा मोरे, बलुटी साखरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने