Nd hotel chandrapur : गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी ND हॉटेल मध्ये 1 सप्टेंबर ला धाड मारली या धाडीत 9 जण रूम नंबर 114 मध्ये 52 पत्त्याचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी जुगार बहाद्दरांना ताब्यात घेत महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले.
1 सप्टेंबर ला रामनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांना nd हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांची परवानगी घेण्यात आली, त्यानंतर रामनगर पोलिसांनी ND हॉटेलच्या रूम नंबर 114 मध्ये धाड टाकली असता त्याठिकाणी तब्बल 9 जुगार बहाद्दर 52 पत्त्यावर पैसे लावत हारजित चा खेळ खेळत होती.
विशेष म्हणजे 1 सप्टेंबर ला रात्री झालेल्या या कारवाईची शहरात दिवसभर चर्चा होती मात्र फिर्यादी पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुगार बहाद्दर यांचे नाव सांगण्यासाठी टाळाटाळ केली, अधिकारी सहित फिर्यादी सुद्धा पत्रकारांच्या कॉल ला प्रतिसाद देत नव्हती, अखेर सायंकाळी आरोपी यांचे नाव सांगण्याचा मुहूर्त ठरला व पोलीस प्रशासनाने नावे पत्रकारांना सांगितली, उद्या जर कुणी सामान्य नागरिक जुगार खेळताना आढळला तर त्यांचे नाव न विचारला पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात येतात मात्र या कारवाईत तसे झाले नाही, कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे पोलीस का बरं विसरतात?
विशेष बाब म्हणजे 9 जुगार बहाद्दर पैकी 4 सेवानिवृत्त तर 2 नोकरी करणारे आहे, 60 वर्षीय राजेंद्र नाईक, 68 वर्षीय लक्ष्मीकांत कैंकरीअमवार, 50 वर्षीय नरेश मुन, 66 वर्षीय यशवंत रत्नपारखी, 52 वर्षीय विलास खडसे, 38 वर्षीय मयूर गेडाम, 65 वर्षीय श्यामराव थेमस्कर, 54 वर्षीय अजय वरकड व 27 वर्षीय अंकित निलावार यांचा समावेश आहे.
जुगार बहाद्दर यांच्याकडून मोबाईल, दुचाकी, चारचाकी व रोख असा एकूण 18 लाख 41 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ND हॉटेल हे काही दिवसांपूर्वी सुद्धा जुगारावरून प्रकाश झोतात आले त्यानंतर काही वेगवेगळ्या घटनाक्रम याठिकाणी घडला अशी चर्चा सुरू होती, यापूर्वी या हॉटेलमध्ये IPL मधील बुक्की यांनी सुद्धा जुगार खेळण्यासाठी हॉटेल मधील रूम बुक केली होती. एकाच रूम मध्ये दारू व नॉन व्हेज भेटत असल्याने हे जुगार बहाद्दर यांचं आकर्षणाचे केंद्र बनत आहे.