Chandrapur murder news : 400 रुपयासाठी चंद्रपुरात युवकाची हत्या

Chandrapur murder news : 400 रुपयासाठी चंद्रपुरात युवकाची हत्या

 Chandrapur murder news चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढत चाललेला आहे, गोळीबार, खून अश्या अनेक घटनांनी चंद्रपूर हादरून गेला आता 400 रुपयासाठी मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Chandrapur murder news


Chandrapur murder news उसनवारी दिलेले पाचशे रुपये परत मागण्यावरून दोन मित्रांत वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोघांनीएकमेकांच्या डोक्यावर लोखंडी रॉडणे वार केला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना अष्टभुजा वार्डात तानापोळ्याच्या दिवशी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. आशिष परसराम असे मृतकाचे नाव आहे. तर साईनाथ रंगारी हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी साईनाथचा भाऊ भावनाथ रंगारी याला अटक केली आहे. 


मृतक आशिष व साईनाथ हे दोघे मित्र होते. आशिषणे साईनाथ ला पाचशे रुपये उसने दिले होते. त्यापैकी शंभर रुपये त्याने परत केले होते. मात्र चारशे रुपये त्याच्याकडे बाकी होते. ताना पोळ्याच्या दिवशी आशिष साईनाथच्याया घरी गेला. त्याने आपण दिलेले उसनवारी पैशासाठी तगादा लावला.यामुळे त्यांच्यात वाद झाला.वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.  दोघांनीही एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. साईनाथने आशिषच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले.


 आशिषने सुध्दा साईनाथला मारहाण केली. यावेळी साईनाथचा भाऊसुद्धा त्याच्या मदतीला गेला. यात आशिष व साईनाथ दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. दोघालाही रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान आशिषचा मृत्यू झाला. तर साईनाथला सावंगी मेघे येथे हलविण्यात आले. याबाबतच्या माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच भावनाथ रंगारी याला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने