चंद्रपूर जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या?

चंद्रपूर जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या?

Chandrapur murder news
वरोरा - आज द्वितीय वर्षाचा आज पेपर होता, पेपरपूर्वी युवक दुचाकीवर मित्रांसोबत फुकटनगर येथे फिरत होता, मात्र त्याठिकाणी त्याचा मृत्यू तिथे वाट बघत होता.वरोरा शहरातील फुकट नगर येथे लाकडी दांड्याच्या सहाय्याने एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना आज शनिवारी 20 मे रोजी सकाळी 9.30 वाजता उघडकीस आली आहे. रीतेश रामचंद्र लोहकरे 19 असे मृत तरुणाचे नाव आहे.

रितेश चा मृतदेह हा मानवी वस्तीपासून अगदी पन्नास मीटर अंतरावर आढळला. मात्र ही घटना होत असताना कोणालाच कसे समजले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रितेश रामचंद्र लोहकरे हा बोर्डा येथील विकास नगर येथील रहिवासी असून सकाळी एका मित्राला घेऊन फुकटनगर भागात गाडीवर फिरत होता. आणि आज त्याचा द्वितीय वर्षाचा पेपर सुद्धा होता असे समजते. Chandrapur murder news

त्यानंतर थोड्याच वेळाने फुकटनगर येथील वनविभागाचे गेटजवळ फुकटनगर मधीलच आरोपी अनिमेष रेड्डी याने लाकडी दांड्याने मृतक रितेशच्या डोक्यावर प्रहार केला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेदरम्यान मृतकाच्या सोबत फिरणाऱ्या संशयित पियुष ढेंगळे याला पोलिसाने विचारपूस करण्याकरिता ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अनिमेष रेड्डी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार झाला होता.

वरोरा पोलीस त्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी रेड्डीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करत आहे. सदर घटना प्रेमप्रकरणातून घडली अशी माहिती आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने