चंद्रपूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांला लाच घेताना अटक

चंद्रपूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांला लाच घेताना अटक

Chandrapur acb trap

चंद्रपूर - चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या हाती येताच त्यांनी भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. Bribe trap


Police bribe trap


चंद्रपूर - महिन्याभरा पूर्वी चंद्रपुरातील दुर्गापूर पोलीस ठाण्यात रुजू झालेले 55 वर्षीय सहायक फौजदार नरेश शेरकी यांना 26 ऑगस्टला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

चंद्रपूर निवासी नरेश शेरकी हे दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथक प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत होते.

दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये कलम 379 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या मित्राला आरोपी न करण्यासाठी नरेश शेरकी यांनी मध्यस्थी म्हणून तक्रारदाराला 70 हजार रुपयांची मागणी केली होती.

मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली, सदर तक्रारीची पडताळणी केल्यावर 26 ऑगस्टला 50 हजार रुपये स्वीकारत उर्वरित 20 हजार नंतर स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

नरेश शेरकी यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्वीकारले, रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेरकी यांना अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार रमेश दुपारे, अरुण हटवार, हीवराज नेवारे, रोशन चांदेकर, नरेशकुमार ननावरे, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, अमोल सीडाम, प्रदीप ताडाम व मेघा मोहूर्ले आणि पुष्पा काचोळे यांनी केली.


सदर पोलीस कर्मचारी हा महिन्याभरा पूर्वी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथकाची सूत्रे स्वीकारली होती, मात्र महिन्याभरात ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने