पती-पत्नीची अमानुषपणे हत्या

पती-पत्नीची अमानुषपणे हत्या

Double murder

सातारा - जिल्ह्यातील मान तालुक्यात पती-पत्नीच्या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार करीत पती-पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
Double murder
माण तालुक्यातील आंधळी गावात राहणारे संजय रामचंद्र पवार व मनीषा संजय पवार यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञाताने धारदार शस्त्राने अमानुष पणे वार करीत हत्या केली.


या घटनेनंतर आंधळी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे, शनिवारी रात्री 10 नंतर पवार दाम्पत्य शेतात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते, काही वेळाने शेतात अज्ञात हल्लेखोराने पती-पत्नी च्या गळ्यावर, डोक्यावर व मानेवर अमानुषपणे वार करीत हत्या केली.


रविवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यावर गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, पोलीस दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास करीत आहे.
या अमानुष हत्येचं कारण अद्याप पुढे आले नसून सातारा पोलीस या हत्याकांडाचा तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने