दुचाकी वाहन चोरी करणारी टोळी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

दुचाकी वाहन चोरी करणारी टोळी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Chandrapur crime

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीची घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी निर्देशांची अंमलबजावणी करीत विशेष पथक स्थापन केले.


Two-wheeler theft gang



सदर पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे तपासली, गोपनीय बातमीदार नेमले, यावेळी पथकास गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम हे विना कागदपत्रांची व विना नंबरची मोटारसायकल विक्री करीता बायपास चौक येथे फिरत आहे.



स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ त्याठिकाणी पोहचत दोघांना ताब्यात घेतले, 24 वर्षीय अक्षय भलमे, 19 वर्षीय मंगेश मडावी राहणार गडचिरोली व सोबत असलेला 19 वर्षीय रोहित लोनगाडगे यांची चौकशी केली असता त्यांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरी केल्याचे कबूल केले.



यावेळी आरोपी जवळून राजुरा, बल्लारशाह, कुरखेडा, आष्टी, मुलचेरा, गडचांदूर अश्या एकूण 9 दुचाकी सहित 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



तिघांची टोळी विविध जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत जात दुचाकी वाहन चोरी करीत होते, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोउपनी विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे, सीसीटीएनएस चे गोपाळ पिंपलशेंडे, व सायबर पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने