आमदाराचे जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

आमदाराचे जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

Pune crime news
पुणे - राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचे पुणे येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न शनिवारी रात्री अज्ञातांनी केला.


Mla Rohit Pawar Office Pune
कार्यालय परिसरात सायकलची जाळपोळ


या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

हडपसर परिसरातील सृजन हाऊस या ठिकाणी आमदार रोहित पवार यांचं जनसंपर्क कार्यालय आहे, शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी कार्यालयात प्रवेश करीत जाळपोळ केली.

या जाळपोळीत कार्यालयातील प्रमाणपत्र व सायकल जाळण्यात आली आहे, जनसंपर्क कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 3 जण जाळपोळ करताना कैद झाले आहे, ही घटना कुणी व का केली? याबाबत हडपसर पोलीस तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने