6 महिन्याच्या बाळासाहित चौघांना जिवंत जाळले

6 महिन्याच्या बाळासाहित चौघांना जिवंत जाळले

India brutal crime news

जोधपूर - ओसीयान तहसील मधील चौराई या गावात मंगळवारी रात्री क्रूर हत्याकांडाने राज्य हादरुन गेले, एकाच परिवारातील चौघांना जिवंत जाळण्यात आले विशेष म्हणजे मृतकामध्ये 6 महिन्याचे बाळ सुद्धा होते.
Brutal crime jodhpur



सदर घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, रात्री 55 वर्षीय पुनराम त्याची पत्नी 50 वर्षीय भंवरी, 24 वर्षीय सून धापु व 6 महिन्यांची मुलगी घरात झोपले होते.
रात्री काही अज्ञातांनी पुनराम यांच्या घरी प्रवेश केला आधी चौघांचा गळा चिरला त्यानंतर सर्वाना घराच्या अंगणात ओढत जाळण्यात आले.

सकाळी घरातून धूर निघत असताना शेजाऱ्यांना दिसताच ते तात्काळ पुनराम च्या घरी दाखल झाले असता त्यांना अंगणात रक्ताचा सडा व 4 मृतदेह जळलेल्या अवस्थेत दिसले, 6 महिन्याच्या मुलीचा मृतदेह पूर्ण जळाला होता तर उर्वरित मृतदेह 30 टक्के जळाले अशी माहिती पोलीस निरीक्षक आमना राम यांनी दिली.

पुनराम हे शेती करीत होते त्यांचे अद्याप कुणाशी वैर नव्हते असे तपासात निष्पन्न झाले आहे, या नृशंस हत्याकांडाचा तपास पोलीस करीत असून घटनास्थळी फॉरेन्सिक चमू दाखल झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने