घरफोडीच्या तपासात चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागले मोठे घबाड

घरफोडीच्या तपासात चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागले मोठे घबाड

Chandrapur burglary crime

चंद्रपूर - एका घरफोडीच्या तपासात चंद्रपूर पोलिसांना मोठं घबाड हाती लागत 2 वर्षात झालेल्या 12 घरफोडयांचे आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले.

chandrapur police big action
रामनगर पोलिसांनी पकडले मोठे घबाड


मार्च महिन्यात शहरातील तुकुम भागातील गुरुद्वारा रोडवरील देऊळकर कुटुंब हे मुंबई ला गेले होते, या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी घरी प्रवेश करीत तब्बल 7 लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केला, याबाबत देऊळकर यांनी 27 मार्च 2023 ला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.


घटनेचा तपास करीत असताना पोलिसांच्या हाती काही लागत नव्हते, गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला असता मागील 2 वर्षात चंद्रपुरात झालेल्या घरफोडीच्या अनेक घटना घडल्या होत्या त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास करावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते.
रामनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक व पोलीस निरीक्षक लता वाढीवे, राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला, प्रत्येक घरफोडी च्या प्रकरणात पोलिसांनी अनेक बाजू तपासून बघितल्या होत्या.

तपास करीत असताना संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी पाळत ठेवली असता 30 वर्षीय बिश्वजित विमल सरकार याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली.
पोलीस खाक्या दाखविल्यावर मार्च महिन्यात व झालेली घरफोडी सहित बिश्वजित ने तब्बल 12 घरफोडी केल्याची कबुली दिली, त्याच्यासोबत या गुन्ह्यातील साथीदार भद्रावती येथील 28 वर्षीय दिवाकर गलकोंडावार, चंद्रपुरातील 29 वर्षीय शुभम येणपल्लीवार, चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील 25 वर्षीय बिकर्ण बिश्वास यांना ताब्यात घेण्यात आले.


12 विविध घरफोडीत चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने चंद्रपूर शहरातील भानापेठ भागातील सोनार 29 वर्षीय तन्मय घोष याला मध्यस्थी 28 वर्षीय अमित बिस्वास मार्फत विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणात 6 आरोपीना अटक करित 682.638 ग्राम वजनाचे सोने किंमत 40 लाख 27 हजार 700 रुपये, चांदीने वितळविलेली रगडी किंमत 1 लाख 8 हजार असा एकूण 41 लाख 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु व पोलीस उपविभागीय अधिकारि सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, लता वाढीवे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने