चंद्रपूर जिल्ह्यात संतापजनक घटना

चंद्रपूर जिल्ह्यात संतापजनक घटना

Brutal rape chandrapur


चंद्रपूर/जिवती - देशात मणिपूर च्या घटनेवरून सध्या वादंग निर्माण झाला असून प्रत्येक राज्यात त्या घटनेचा निषेध सुरू आहे, त्या घटनेनंतर सुद्धा महिला अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

brutal rape news
संतापजनक घटना


चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या जिवती तालुक्यात मतिमंद मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.


जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील आंबेझरी गावात 24 जुलै ला 19 वर्षीय मतिमंद मुलगी घरात असताना त्याच गावात राहणारा 44 वर्षीय शरफोद्दीन शब्बीर शेख याने पीडित मुलगी एकटी घरी असल्याचा फायदा घेत प्रवेश केला, त्यांनतर आरोपी शेख याने त्या मुलीचे हात-पाय बांधत तिच्यावर अत्याचार केला.


अत्याचार केल्यावर आरोपीने तिथून पळ काढला, आई-वडील घरी आल्यावर मुलीची बिकट अवस्था बघितल्यावर तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आली.


मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत पिट्टीगुडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास करीत आरोपी शरफोद्दीन शबीर शेख याला 2 तासात अटक केले.
पोलिसांनी आरोपीवर एट्रोसीटी व 376(1), 376 (2)(जे), 376 (2)(एल), 450 भांदवी सहकलम 3(l)(w)(i)(ii)3,2 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने