चंद्रपूर शहरातील नामवंत डॉक्टरने केली आत्महत्या

चंद्रपूर शहरातील नामवंत डॉक्टरने केली आत्महत्या

Chandrapur suicide news

चंद्रपूर - शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ.उमेश अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.
Doctor suicide in chandrapur
शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचा साई आय क्लिनिक आहे, रात्री 8 ते 8.30 दरम्यान क्लिनिक मधील रेस्टरूम मध्ये डॉ.अग्रवाल यांनी हेवी डोज चे इंजेक्शन घेतले होते.


डॉक्टरने इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉ. उमेश अग्रवाल यांची पत्नी सुद्धा डॉक्टर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच IMA चे पदाधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण अद्याप अस्पष्ट आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने