Prostitution in Chandrapur : टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या नावाने चंद्रपुरात देहविक्रीचा व्यवसाय

Prostitution in Chandrapur : टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या नावाने चंद्रपुरात देहविक्रीचा व्यवसाय

 Prostitution in Chandrapur चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील पॉश एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली. तर, या कुंटणखान्यातून एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका करण्यात आली. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे.

Prostitution in ChandrapurProstitution in Chandrapur रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅट मध्ये गेडाम यांनी गणराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कार्यालय उघडले होते. या कार्यालयाच्या आड त्याने देह व्यवसाय सुरु केला होता.

अवश्य वाचा : चंद्रपुरात चोराने डाव साधला


या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखाना चालवित होता. रोज नवनवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण फ्लॅटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

थरारक : म्हणून झाली तुळजाबाई ची हत्या


Prostitution in Chandrapur दरम्यान, बुधवारी पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठविला. खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली. तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले. तिची या कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 


अवश्य वाचा : कृषी अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आरोपी गेडाम ला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, शहरात गेडाम यांच्या संपर्कात असलेल्या टोळीचा पर्दाफाश या 3 दिवसांच्या कालावधीत होऊ शकतो. सदर देहविक्री व्यवसाय हा मागील दीड महिन्यापासून सुरू होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने