चंद्रपूर जिल्ह्यात महिलेची हत्या

चंद्रपूर जिल्ह्यात महिलेची हत्या

Chandrapur murder

चंद्रपूर/पोम्भूर्णा - 10 जुलै ला चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा तालुक्यात घडलेल्या हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरुन गेला, नात्यात काळिमा फासण्यासारखे काम करीत 20 वर्षीय युवकाने मोठ्या आईची दगडाने ठेचून हत्या केली.


chandrapur crime news
चंद्रपूर जिल्ह्यात महिलेची हत्या



10 जुलै ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय युवकाने मोठ्या आईच्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, आरोपी युवकाने मला 20 हजार रुपये दे अन्यथा तुझ्यावर रेप करतो, पैसे दिले नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकणार अशी धमकी देत पीडित महिलेचा मोबाईल आरोपीने जवळ ठेवला, पीडित विवाहित महिलेने सुटका करण्यासाठी 20 हजार रुपये देण्याचे कबूल करीत तिथून निघून गेली.



मात्र पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या सासू ला सांगितला, सदर प्रकार ऐकून पीडितेची 62 वर्षीय सासू चा राग अनावर झाला ती थेट आरोपी युवकाकडे मोबाईल व जाब विचारण्यासाठी गेली.
मात्र बराच वेळ झाला ती महिला घरी परतली नाही, त्या महिलेचा मुलगा त्याठिकाणी गेला असता त्याची आई खतांच्या ढिगाऱ्यात रक्तबंबाळ अवस्थेत दिसली, आईचा खून झाला हे समजताच पोलिसांना माहिती देण्यात आली.



महिलेच्या नाका-तोंडावर दगडाचे वार असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपी युवकांवर कलम 354, 354ब, 302, 329, 201 व 506 अंतर्गत गुन्हे दाखल केले, आरोपी युवक तोपर्यंत गावातून जंगलाच्या दिशेने पळाला, याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी कसोशीने शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने