घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक

घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक

Robbery crime news


रायगड/पेण- पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंग मध्ये घुसून घरफोडी करणाऱ्या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. Lcb raigad

Local crime branch raigad


त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा कार ताब्यात घेण्यात आली आहे. या सराईत दरोडेखोरांवर राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल आहेत.


7 जुलै रोजी दुपारच्या वेळेत पेण शहरातील चिंचपाडा मधील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट व रामवाडी येथील साई सृष्टी अपार्टमेंट या बिल्डिंग मध्ये घुसून स्क्रुड्रायव्हरच्या साहाय्याने दरवाजाची कडी तोडून घरात घुसून घरफोडी करणाऱ्या सांगली येथील सराईत गुन्हेगार लोकेश रावसाहेब सुतार वय-30 व अरुण वसंत पाटील वय-26 दोन्ही राहणार लिंगनूर, ता.मिरज, जि. सांगली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक केली आहे. 


सदर गुन्हेगार हे नगर, मुरबाड, कल्याण मार्गे पनवेल वरून पेण येथे चोरी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी चिंचपाडा व रामवाडी येथे रेकी करून वरील दोन्ही बिल्डिंग मधील बंद असलेल्या फ्लॅट मध्ये घुसून घरफोडी केली. यावेळी त्यांनी 3 लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने चोरले. 

घरफोडी केल्यानंतर महाड, महाबळेश्वर मार्गे सदर चोर सांगली येथे पळून गेले.
या घरफोडीचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांची एक टीम मिरज, सांगली येथे रवाना झाली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहिती नुसार लिंगनूर गावात दोन दिवस दबा धरून तपास करत असताना सदर चोरांनी फिल्मी स्टाईलने घरांवरून उड्या मारीत पळण्याचा प्रयत्न केला व एका खंडर मध्ये जाऊन लपले. यावेळी अलिबाग पोलिसांनी सापळा रचून कसोशीने शोध घेऊन सदर चोरांच्या मुसक्या आवळल्या.



यावेळी अलिबाग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवीत अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चोरी केलेले 3 लाख 29 हजार रुपयांचे 10 तोळे सोने व दरोड्यात वापरण्यात आलेली MH-10-DG-6774 क्रमांकाची 8 लाख किंमतीची होंडा कार असे एकूण 10 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर दरोडेखोरांवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 29 गुन्हे दाखल आहेत.


पेण येथे झालेल्या सदर घरफोडीचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे यांनी केला आहे. आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचे सोन्याचे दागिने फक्त चार दिवसांत मिळाल्याने रायगड पोलिसांचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने