हा माझ्या कुटुंबाचा शेवटचा सेल्फी आणि घडले भयानक

हा माझ्या कुटुंबाचा शेवटचा सेल्फी आणि घडले भयानक

Bhopal crime news
भोपाळ - ऑनलाइन app च्या जाळ्यात अडकून जोडप्याने आपल्या 2 मुलांसाहित आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली.

bhupendra vishwakarma family suicide bhopal
भुपेंद्र विश्वकर्मा यांचा कुटुंबासहित शेवटचा सेल्फी


38 वर्षीय भुपेंद्र विश्वकर्मा हे कोलंबिया येथील एका कंपनीत online Job करायचे, भुपेंद्र यांच्यावर कामाचा व कर्जाचा डोंगर उभा होता, मात्र तरीही ते न हरता काम करीत होते, रतीबाद येथील शिव विहार कॉलनीत राहणारे विश्वकर्मा कुटुंबाला कुणाची तरी वक्रदृष्टी पडली आणि संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले.


कंपनीने भुपेंद्र यांचा मोबाईल व लॅपटॉप Hack केले होते, लॅपटॉप मध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींचे व्हिडीओ अश्लील स्वरूपात एडिट करीत त्याला व्हायरल केले होते, जर ते थांबवायचे असेल तर 17 लाख रुपयांची मागणी विश्वकर्मा कुटुंबाला करण्यात आली होती.


सतत होत असणाऱ्या पैशाच्या मागणीला भुपेंद्र त्रस्त झाले होते, अखेर ते त्या त्रासापुढे नमले व त्यांनी मोठा निर्णय घेत स्वतः व कुटुंबासाहित आत्महत्या केली.


रात्रीच्या वेळी भुपेंद्र यांनी पत्नी 38 वर्षीय रितू, 3 वर्षीय ऋतुराज, 9 वर्षीय ऋषीराज यांच्यासह सेल्फी काढला, त्यानंतर दोन्ही मुलांना सल्फास युक्त थंड पेय पाजले, दोन्ही मुलांचा मृत्यू होई पर्यंत भुपेंद्र व पत्नी रितू दोघेही मुलाजवळ बसले, मुलांचा मृत्यू होताच भुपेंद्र व रितू यांनी 2 दुपट्टे घेत गळफास घेत आत्महत्या केली.


भुपेंद्र यांच्या घरून 6 सल्फास ची पॉकेट पोलिसांना मिळाली, पहाटे 4 वाजता भुपेंद्र यांनी सर्वाना मॅसेज करीत हा आमचा शेवटचा सेल्फी असे सांगितले व सुसाईड नोट सुद्धा पाठवली.
भुपेंद्र यांच्यासोबत सायबर गुन्हा घडला, त्याने नैराश्यात जात भुपेंद्र यांनी कुटुंबासाहित आत्महत्या केली, विशेष म्हणजे त्यांच्या लॅपटॉप मधील व्हिडीओ एडिट करीत भुपेंद्र यांच्या संपर्कात असलेल्या सर्वाना अश्लील व्हिडीओ पाठविण्यात आले.


मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता, भुपेंद्र यांना 17 लाखांची मागणी करण्यात आली, सायबर गुन्हेगारांनी भुपेंद्र यांचे बँक खाती सुद्धा खाली करण्यात आले होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने