पुन्हा नवजात अर्भकाचा जीव गेला तर....चंद्रपूर महिला भाजप आघाडीने दिला इशारा

पुन्हा नवजात अर्भकाचा जीव गेला तर....चंद्रपूर महिला भाजप आघाडीने दिला इशारा

Crime chandrapurभद्रावती - पोलीस स्टेशन येथे अल्काताई आत्राम यांचे नेतृत्वात भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने भद्रावती शहरात मागील वर्ष भरात 3 अर्भके सापडली. 2 दिवसांपूर्वी सुद्धा मृत नवजात अर्भक कुत्र्याने रस्त्यावर आणले. कुठे तरी ही नवजात अर्भक अनधिकृत खाली करणारी टोळी किंवा लोक तर हे करत नसतील कारण अर्भक ही कुठेही फेकल्या जात आहेत म्हणजेच अनधिकृत काही तरी काळे धंदे मानवी कृतीला लाजवेल अशी विकृत लोक नवजात अर्भकांची हत्या करून फेकत असावीत.

chandrapur police
चंद्रपूर भाजप महिला मोर्चाने पोलीस प्रशासनाला दिला इशाराम्हणून या निवेदन द्वारे आपण शहरात जर अशी ठिकाण असतील तर आपण त्याचा शोध घेऊन नवजात अर्भक त्यांचा कुठलाही दोष नसताना या जगात येण्याआधीच कुणी तरी असल्या प्रकारे त्यांची हत्या करण्याचं काम करत आहेत असल्या लोकांवर लवकरात लवकर कडक कार्यवाही करावी अन्यथा अजून एक जीव जाणार नाही याची दक्षता घ्यावी नाही तर यापुढे निवेदन नाही तर मोठे आंदोलन भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने इथे करण्यात येईल.


यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, अर्चना जिवतोडे कोषध्यक्ष, प्रणिता शेंडे उपाध्यक्ष, लता भोयर उपाध्यक्ष, बंदना सिन्हा उ भा महिला अध्यक्ष, सुनंदा माणुसमारे सचिव, रक्षिता निरंजने, ममता राजभर, इंदू कुमारी, प्रभा राजभर, रूम राजभर, ख़ुशी दीदी, साधना दीदी आणि सर्व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने