शिक्षिकेच्या घरी 13 लाखांची चोरी

शिक्षिकेच्या घरी 13 लाखांची चोरी

Chandrapur burglary

बल्लारपुर (रमेश निषाद)

बल्लारपूर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील वाघमारे कुटुंबीयांच्या घरात रविवारी भरदिवसा मोठी चोरी झाली. अज्ञात आरोपींनी गेट वरून उडी मारून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले २५ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला.


Burglaryमाहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी डॉग स्पॉट आणि फिंगर तज्ज्ञांना पाचारण केले. वृत्त लिहेपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र प्रसाद वॉर्डातील केजीएन कॉन्व्हेंटजवळ राहणारे शिवम वाघमारे आणि त्याचा लहान भाऊ शुभम वाघमारे हे रविवारी सकाळी आपल्या कामावर गेले होते. त्यांची आई श्रीमती वाघमारे या राजुरा तालुक्यातील चिंचाळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्या गावी गेल्या होत्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सकाळी दहा ते दोनच्या दरम्यान मुख्य गेटवरून उडी मारून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी दोन कपाटात ठेवलेले सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून पळ काढला.या चोरट्यांनी घरातील इतर कोणत्याही वस्तूला हातही लावला नाही. काही लहान मुलांनी एका तरुणाला बाहेर उभं राहून निरीक्षण करताना पाहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आत काय चाललंय याची त्यांना कल्पना नव्हती. दुपारी अडीच वाजता शुभम कामावरून परतला असता घरात चोरी झाल्याचे त्याला समजले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने