या क्रूर घटनेमुळे विदर्भ हादरला

या क्रूर घटनेमुळे विदर्भ हादरला

Amravati crime

अमरावती - लिव्ह इन रिलेशनशिप च्या नावावर देशात अनेक क्रूर घटना घडल्या आहे, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र अशीच एक घटना विदर्भातील अमरावती जिल्ह्यात घडली आहे.
Amravati crime
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेले प्रियकर व प्रेयसी, काही दिवसांनी दोघांमध्ये भांडण व नंतर प्रेयसी आपल्या आई सोबत रहायला गेली, याचा राग प्रियकराला आला त्याने प्रेयसीची आई व तिच्या भावाला जिवंत जाळले व त्यांनतर स्वतः आत्महत्या केली.


अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वंडली याठिकाणी ही घटना घडली, प्रियकर 25 वर्षीय आशिष ठाकरे यांचे एका मुलीवर प्रेमसंबंध होते, मात्र दोघांचे प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबियांना मान्य नव्हते, यासाठी दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.


दोघे लीव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले, काही काळानंतर दोघांमध्ये भांडणे होऊ लागली, प्रेयसी तरुणीने प्रियकर आशिष सोबत भांडण करीत आपल्या आईच्या घरी रहायला गेली, मात्र त्यानंतर आशिष अनेकदा प्रेयसीला परत नेण्यासाठी घरी गेला होता.


प्रेयसीची आई व भाऊ तिला आशिष जवळ पाठविण्यास तयार नव्हते, तरुणीच्या आई व भावासोबत आशिष चे जोरदार भांडण सुद्धा झाले होते.


याचा राग मनात धरून रविवारी रात्री 1 वाजता आशिष प्रेयसीच्या घरी गेला व तिच्या आई व भावाला त्याने जिवंत जाळत दोघांना ठार केले, त्यावेळी प्रेयसी ही घरी नव्हती, केलेल्या कृत्यामुळे आशिष घाबरला त्याने सुद्धा स्वतःला जाळून आत्महत्या केली.

पोलिसांना याबाबत सूचना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिथे फक्त राख वाचली होती.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने