गो तस्करांवर विरुर स्टेशन पोलिसांची कारवाई

गो तस्करांवर विरुर स्टेशन पोलिसांची कारवाई

Chandrapur cattle smuggling


चंद्रपूर/विरुर स्टेशन - चंद्रपूर जिल्हा हा तेलंगणा राज्यातील सीमेवर असल्याने गो तस्करांना गोवंश जनावरे नेण्यासाठी चंद्रपूर हा सोयीस्कर जिल्हा आहे, मात्र चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गो तस्करांच्या या तस्करीवर करडी नजर असल्याने मागील अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या तस्करीवर पोलीस प्रशासन भारी पडले आहे.


Cattle smugglingअसाच तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी 12 ऑक्टोबर ला हाणून पाडला, विरुर स्टेशन पोलिसांना गोपनीय बातमीदाराने गो तस्कर संदर्भात महत्वाची माहिती दिली होती.माहितीच्या आधारे लक्कडकोट परिसरात सकाळी नाकाबंदी केली असता दोन पिक अप वाहन ज्यामध्ये गोवंश घेऊन जात आहे अशी माहिती वरुन नाकाबंदी लावण्यात आली होती.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांना दोन संशयित वाहन पोलिसांच्या नजरेस पडले, पोलिसांनी ते वाहन थांबविले असता त्यामध्ये वीस गोवंश अंदाजे किंमत 1 लाख 20 हजार रुपये दोन वाहन MH 33 T3941, MH 34 BG 3694 किंमत अंदाजे 8 लाख असे एकूण 9 लाख 20 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनास्थळातून एक आरोपी याला ताब्यात घेण्यात आले असून एक ड्रायव्हर घटनास्थळ फरार झाला. प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक अजय मडावी, पोलीस कर्मचारी सुनील मेश्राम, विजय तलांडे, प्रमोद मिलमिले, रामदास निलेवार, प्रवीण जूनघरे, होमगार्ड इलियास शेख व पतरू ठाकरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने