नागपुरातून तो चारचाकी वाहन चोरण्यासाठी जेव्हा चंद्रपुरात आला

नागपुरातून तो चारचाकी वाहन चोरण्यासाठी जेव्हा चंद्रपुरात आला

Chandrapur crime news

चंद्रपूर - 13 ऑक्टोबर ला शहरातील गंजवार्ड येथे राहणारे सतीश घोडमारे यांची चारचाकी वाहन अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली होती. शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी व वाहनाला ताब्यात घेतले.

Chandrapur crime


गंजवार्ड येथे राहणारे 39 वर्षीय सतीश घोडमारे यांनी चारचाकी वाहन टाटा सुमो गोल्ड क्रमांक MH32 Y2497 हे रामकृष्ण अपार्टमेंट च्या पार्किंगमध्ये ठेवले होते, 13 ऑक्टोबर ला सदर वाहन त्याठिकाणी आढळून आले नाही, त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र वाहन मिळून न आल्याने त्यांनी याबाबत शहर पोलिसात वाहन चोरीची तक्रार नोंदविली.


गुन्हे शोध पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे यांनी रामकृष्ण अपार्टमेंट च्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यामध्ये पहाटे 4.15 वाजताच्या दरम्यान 1 इसम वाहन चोरताना दिसला, भोंगाडे यांनी गुन्हे शोध पथक चमुसह नंदोरी, वरोरा, वर्धा व नागपूर जिल्ह्यात जात आरोपीबाबत माहिती काढत त्याला ताब्यात घेतले, आरोपी 33 वर्षीय प्रतीक उर्फ मयूर धनराज झाडे कडून चोरी केलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.


आरोपीची चौकशी केली असता सोनेगाव येथील अपार्टमेंट मधील दुचाकी वाहन MH31 EH1148 चोरून चंद्रपुरात आणली असल्याचे सांगितले शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी प्रतीक जवळून चारचाकी व दुचाकी वाहन असा एकूण 5 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश राजपूत, सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनी शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, चेतन गज्जलवार, भावना रामटेके, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद शेख, रुपेश रणदिवे, सुमित बरडे व संतोष कावळे यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने