367 रुपयासाठी अल्पवयीन मुलाने केली हत्या

367 रुपयासाठी अल्पवयीन मुलाने केली हत्या

Delhi crime news

दिल्ली - मंगळवारी 21 नोव्हेंबर च्या रात्री 18 वर्षीय मुलाची अल्पवयीन मुलाने 367 रुपयासाठी क्रूरपणे हत्या केली, इतकेच नव्हे तर युवकाची हत्या केल्यावर आरोपी मुलाने मृतदेह पुढे नाचू लागला.

Brutal murder
सदर हत्या ही लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, अल्पवयीन मुलाने आधी 18 वर्षीय मुलाला ओढत निर्जनस्थळी नेले, त्यांनतर त्याचा गळा आवळून खून केला, तो युवक मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी अल्पवयीन मुलाने त्या युवकाच्या गळ्यावर चाकूने तब्बल 60 वेळा वार केले.


युवकाचा मृत्यू झाल्यावर आरोपी अल्पवयीन मुलगा मृतदेहाजवळ नाचू लागला, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली असून त्याच्याजवळील लुटलेले 367 रुपये जप्त केले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने