चंद्रपूर जिल्ह्यात जुन्या वादातून युवकावर खुनी हल्ला

चंद्रपूर जिल्ह्यात जुन्या वादातून युवकावर खुनी हल्ला

Chandrapur crime news
गुरू गुरनुले

मुल - मुल तालुक्यातील मौजा गडीसूर्ला येथील एका १९ वर्षीय मुलावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून गंभीर जखमी मुलाचे नाव 19 वर्षीय सुजल विनोद बुबडे आहे तर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव भूषण राजू चचाने वय १९ व गणेश अशोक शेंडे वय १९ रा.मुल असे आरोपीचे नाव आहे.

Maharashtra crimeपोलिस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार मुल तालुक्यातील गडीसूरला येथील सुजल विनोद बुबडे रां. गडीसूर्ल हा मुल येथे आपल्या आजीकडे राहून शिक्षण घेत होता, या दरम्यान गुरुवारी तो आपल्या गावी गडीसुरला येथे आला होता.रात्री ८-०० वाजता दरम्यान ती गावातील पाण्याच्या टाकीजवळ असताना मुल येथील भूषण राजू चचाने वय १९ व गणेश अशोक शेंडे वय १९ यांनी सुजल वर धारदार चाकूने पाठीवर आणि पोटावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.
जखमी सुजल विनोद बुबडे याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मुल पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव गंगेत घटना स्थळाचा पंचनामा करून आरोपीला अटक केली.


घटनेचे कारण काय?

काही दिवसांपूर्वी सुजल चा आरोपी शेंडे व चचाने सोबत भांडण झाले होते, त्यामध्ये आरोपीला ला सुजल ने मारहाण केली होती, त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला सुजल वर करण्यात आला अशी माहिती ठाणेदार परतेकी यांनी दिली, सध्या सुजल ची प्रकृती धोक्याबाहेर आहे.


आरोपीवर भादवी कलम ३०७ (३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने