चंद्रपूर शहर पोलिसांना आरोपीच्या रुपात मिळालं एटीएम आणि...

चंद्रपूर शहर पोलिसांना आरोपीच्या रुपात मिळालं एटीएम आणि...

Chandrapur crime news

चंद्रपूर - 23 नोव्हेम्बरला देवाडा येथे राहणारे 20 वर्षीय अमित चिलमूलवार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली, विसापूर येथून फटाके खरेदी करून झाल्यावर परत गावी जात असताना बायपास मार्गावरील एपीजे अब्दूल कलाम उद्यानासमोर त्यांच्या दुचाकी वाहनाचा एक्सलेटर वायर तुटला, त्यांनी आपले वाहन तिथे उभे केले मात्र दुसऱ्या दिवशी ते तिथे आढळून आले नाही, आजूबाजूला दुचाकी वाहनाची शोधाशोध केली मात्र वाहन कुठे आढळले नाही.


Chandrapur crime



अमित चिलमूलवार हे आपल्या दुचाकी डिओ वाहन क्रमांक mh34AQ1193 ने विसापूर येथे फटाके खरेदी करायला गेले होते, फटाके खरेदी केल्यावर ते परत गावी जाण्यासाठी निघाले असता बायपास मार्गावर त्यांच्या वाहनाचा एक्सलेटर वायर तुटला, त्यांनी आपले दुचाकी वाहन एपीजे अब्दुल कलाम उद्यानासमोर लावले आणि घरी गेले, दुसऱ्या दिवशी वाहन घेण्यासाठी अमित परत आला मात्र त्याठिकाणी त्यांना वाहन दिसले नाही.



वाहन चोरी गेले असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीची तक्रार नोंदविली, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर तपास सुरू केला, गुप्त बातमीदाराने पोलिसांना पक्की खबर दिली, त्या माहितीच्या आधारे पोलीस बल्लारपुरात पोहचले, आणि आरोपी पोलिसांच्या अटकेत सापडला.


आरोपी 20 वर्षीय दीपक उर्फ एटीएम अजय राजपूत याला ताब्यात घेतले असता त्याने वाहन चोरीचा गुन्हा कबूल केला, आरोपी दीपक जवळून चोरीला गेलेली दुचाकी असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक रउफ शेख, सहायक फौजदार विलास निकोडे, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद शेख, रुपेश रणदिवे, संतोष कावळे व विशाल बगडे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने