चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात छुपा जुगार

चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात छुपा जुगार

Chandrapur crime
गुरू गुरनुले


मूल - छुप्या पध्दतीने कोंबडयांची झुंज लढवुन जुगार खेळत असताना मूल पोलीसांनी धाड टाकुन 6 जणांना अटक केली आहे तर 9 दुचाकी वाहन, 2200 रुपये आणि तिन कोंबडे जप्त केलेले आहे.


The gambling


 सदर घटना मूल तालुक्यातील मौजा चिखली कन्हाळगाव मार्गावरील जंगल परिसरात रविवारी दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. 


अल्पवयीन मुलगा रा. मूल, विकास देविदास मोहुर्ले वय 30 वर्षे रा. सिंदेवाही, माधव मडावी वय 26 वर्षे रा. सरडपार, गणेश परशुराम नन्नावरे वय 32 वर्षे रा. लौनखेरी, मनोज दिलीप खोब्रागडे वय 32 वर्षे रा. मारोडा, बादल भाटे रा. मोरवाही यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 



तालुक्यातील चिखली परिसरात कोंबडयांची झुंज लावुन त्यांच्यावर हार जितचा जुगार खेळल्या जात असल्याची माहिती मूल पोलीसांना प्राप्त झाली होती. मूल पोलीसांनी शोध मोहीम राबविली असता चिखली कन्हाळगाव मार्गावरील जंगलात काही इसम कोंबडयांची झुंज लावत असताना पोलीसांना दिसुन आले. पोलीस कोंबड बाजारात पोहचताच अनेक जुगारी तिथुन पडुन जाण्यास यशस्वी झाले मात्र अल्पवयीन मुलगा 14 वर्षे रा.. मूल, विकास देविदास मोहुर्ले वय 30 वर्षे रा. सिंदेवाही, माधव मडावी वय 26 वर्षे रा. सरडपार, गणेश परशुराम नन्नावरे वय 32 वर्षे रा. लौनखेरी, मनोज दिलीप खोब्रागडे वय 32 वर्षे रा. मारोडा हे पोलीसांच्या हाती लागले. असुन त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 



यासोबत दुचाकी वाहने ९ जप्त केले असून आरोपीकडून २२०० रुपये व ३ कोंबडे जप्त करण्यात आले. सदरची कारवाई  मुल उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार प्रशांत गायकवाड करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने