चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात 2 म्यान में 2 तलवार

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात 2 म्यान में 2 तलवार

Chandrapur local crime branch news

चंद्रपूर/राजुरा - जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीवर अंकुश लागावे यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा अथक प्रयत्न करीत आहे, अश्यातच राजुरा येथे एका युवकांकडून 2 तलवारी जप्त करीत त्याला अटक करण्यात आली.
जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र व अग्निशस्त्र वापरीत दहशत माजविणाऱ्या वृत्तीवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते.पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाचे पालन करीत पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी पथक तयार करीत गुन्हेगारी वृत्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 14 डिसेंम्बरला राजुरा हद्दीतील गांधी भवन वार्डात राहणाऱ्या 26 वर्षीय सय्यद अहफाज अली सय्यद नुरुद्दीन याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडून 2 तलवारी, 2 म्यान असा एकूण 4 हजार 200 रुपयांचा माल जप्त केला.आरोपी सय्यद अहफाज अली सय्यद नुरुद्दीन यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यानव्ये कलम 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे, याआधी सुद्धा 2 जणांकडून बंदूक जप्त करण्यात आली होती.सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, जमिर पठाण, नितेश महात्मे, व गणेश मोहूर्ले यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने