चंद्रपूर जिल्ह्यात क्षुल्लक वादातून एकाची हत्या

चंद्रपूर जिल्ह्यात क्षुल्लक वादातून एकाची हत्या

Chandrapur murder news

ब्रह्मपुरी - दोन मजुरी करणारे मित्रांनी दारू पिल्यावर क्षुल्लक कारणावरून वाद घातला आणि त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, आणि त्यानंतर झाली एकाची हत्या, ब्रह्मपुरी तालुक्यातील मजुरी करणाऱ्या मित्रांपैकी एकाचा नाहक अंत झाला.
Chandrapur murder news

9 डिसेंम्बर ला ब्रह्मपुरी तालुक्यातील काहाली येथे राहणारा 30 वर्षीय पवन उर्फ गोलू धोटे हा कन्हाळगाव येथे राहणारा 30 वर्षीय रवी नानाजी सहारे सोबत धान कापणीच्या कामाला गेला होता, सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पवन ने लहान भाऊ पराग ला मोबाईलवर कॉल करीत मला आज यायला उशीर होणार, तुम्ही जेवून घ्या, आईला वेळ होणार असे सांगून याबाबत बोलणे झाले.मात्र दुसऱ्या दिवशी पवन चा मृतदेह खेड रोडवरील वखार महामंडळ च्या रस्त्याखाली पडला असल्याची माहिती पराग ला मिळाली, पराग ने तात्काळ त्याठिकाणी धाव घेतली, पवन हा काहीच हालचाल करीत नव्हता, त्याच्या गुप्तांगातुन रक्त निघत होते, पोटावर खरचटले असल्याच्या खुणा होत्या, पराग ने ब्रह्मपुरी पोलीस गाठून याबाबत फिर्याद नोंदविली.पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला, घटनास्थळी हजर असलेल्या एकाने सांगितले की रवि ने पवन ला लाथा बुक्क्याने मारहाण केली होती.पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केला असता रवि सहारे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पवन ला मारहाण केली असे कबूल केले.
धान कापणीच्या कामाला गेले असता रवि आणि पवन ने दारू पिली, मात्र त्यानंतर क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, हाणामारी झाली, रवि ने पवन च्या पोटावर, गुप्तांगावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत रवि सहारे ला अटक केली, घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने