अवघ्या 3 दिवसात घरफोडीचा आरोपी चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात

अवघ्या 3 दिवसात घरफोडीचा आरोपी चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात

Chandrapur crime news

चंद्रपुर - 5 डिसेंबर ला शहरातील भिवापूर प्रभागात कैलास दुर्गे यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 42 हजार 587 रूपयांचा माल चोरून नेला होता, यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात आरोपीला अटक केली.





5 डिसेंबर ला शहरातील भिवापूर वार्डातील आरके चौकात राहणारे कैलास दुर्गे यांनी फिर्याद दिली की आम्ही घरी नसताना कुणी तरी अज्ञाताने घरी प्रवेश करीत लोखंडी अलमारीचा लॉक व लॉकर मधील सोन्या-चांदीचे दागिने असा लाखोंचा माल चोरून नेला.



याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, गोपनीय माहिती द्वारे अवघ्या 3 दिवसात शहर पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी 23 वर्षीय अमोल उर्फ छोटा ईलम आदेश ईलमकर रा.समता नगर दुर्गापूर याला ताब्यात घेतले.



पोलिसांनी आरोपी अमोल ची चौकशी केली असता त्याने दुर्गे यांच्या घरी चोरी केली असल्याची कबुली दिली, पोलिसांनी आरोपी जवळून चोरी गेलेला माल सोन्याचे दागिने (किंमत बाजार भाव नुसार) व रोख असा एकूण 3 लाख 11 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, सपोनि मंगेश भोंगाळे, सपोनि रमिझ मुलानी, पोउपनी शरीफ शेख, पोउपनी संदीप बच्छीरे, पोउपनी विलास गेडाम, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, इर्शाद शेख, रुपेश रणदिवे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने