दिवाळीची खरेदी चंद्रपुरातील महिलेला महागात पडली

दिवाळीची खरेदी चंद्रपुरातील महिलेला महागात पडली

Chandrapur crime news

चंद्रपूर - दिवाळीची खरेदी करायला गेलेल्या महिलेच्या घरात अज्ञात इसमाने प्रवेश करीत रोख व सोन्याचे दागिने असा एकूण 53 हजार रुपयांचा ऐवज लांबविला होता.


Chandrapur crime news


नोव्हेंबर महिन्यात 13 तारखेला दानव वाडी, महाकाली वार्ड येथे राहणाऱ्या 36 वर्षीय निर्मला रवींद्र दानव ह्या दिवाळी सणानिमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या, मात्र त्या गेल्यानंतर अज्ञाताने त्यांच्या घरातील दाराला लावलेला कुलूप तोडत आत प्रवेश केला, त्यानंतर घरातील लोखंडी अलमारीचे कपाट वाकवून त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 53 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.निर्मला दानव जेव्हा घरी आला त्यावेळी घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते, घरी चोरी झाली असे समजल्यावर त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली.चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला, इतरत्र चौकशी करण्यात आली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र त्या अज्ञात इसमाचा शोध लागला नाही, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 19 वर्षीय अमन उर्फ किसन महेंद्र डोंगरे रा. महावीर नगर महाकाली वार्ड याला ताब्यात घेतले.आरोपी अमन ने सदर गुन्ह्याची कबुली दिली, पोलिसांनी आरोपी जवळून सोन्याचे दागिने असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे, पोउपनी शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद शेख, रुपेश रणदिवे, संतोष कावळे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने