Sand Smuggler Raid : चंद्रपूर पोलीस अधिक्षकांचा अवैध धंद्यावर हल्लाबोल

Sand Smuggler Raid : चंद्रपूर पोलीस अधिक्षकांचा अवैध धंद्यावर हल्लाबोल

 Sand Smuggler Raid मूल तालुक्यातील गोंडसावरी गावालगत झोपला मारुती मंदिराजवळ वाहणाऱ्या अंधारी नदी पात्रातून रेतीचा अवैध पद्धतीने उपसा करणाऱ्यांवर नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी धडक कारवाई करत दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. भल्या पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

Sand smugglerपोलिस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साध्या कपड्यांवर तीन किलोमीटर पायी चालत जात मूल पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गोंडसावरी नदीतून रेती भरतांना ही सर्वात मोठी कारवाई केली. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे स्वतःच्या खासगी वाहनाने अंधारी नदीजवळील मार्गावर गेले. त्या ठिकाणी बोलेरो गाडीसह एकजण संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिस अधीक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. Sand Smuggler Raidशाहरुख इस्त्राईल शेख, रा. संजयनगर याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिस अधीक्षक अंधारी नदी पात्रात गेले. तेथे रेती भरून ३ ट्रक उभे होते. पोलिस आल्याची चाहूल लागल्याने तिन्ही हायवा ट्रक चालकांनी वाहनात असलेली रेती नदी पात्रात रिकामी करण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी एमएच ३४ बीजी ५८५२, एमएच ३४ बीजी ०५८५, एमएच ३४ बीजी ५८६१ क्रमांकाचे तीन ट्रक, रेती उत्खननासाठी वापरलेले पोकलँड मशीन, रेती असा १ कोटी ५१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी शाहरुख शेख, श्रावण कुमार पाल, सुनील जांगडे, सफन समाजपती, आकाश गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Sand Smuggler Raid


चार दिवसांपूर्वी मूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुमीत परतेकी यांनीही भेजगाव नदी पात्रातून ट्रॅक्टरने रेती चोरी करणाऱ्यांवर छापा टाकून कारवाई केली होती.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने