Sexual abuse of a minor girl : नागभीड येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Sexual abuse of a minor girl : नागभीड येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 नागभीड - पोलीस स्टेशन नागभीड हद्दीत 7 ऑगस्ट 2020 ला मौजा कसरला येथे दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, सदर अत्याचार प्रकरणातील आरोपीना न्यायालयाने 20 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Sexual abuse7 ऑगस्ट 2020 रोजी 20 वर्षीय अजय मुरलीधर नन्नावरे, 25 वर्षीय मंगेश दिवाकर मगरे यांनी संगनमत करीत अल्पवयीन मुलीला पळवून नेले, व कसरला येथे दोघांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

वाचा - चंद्रपुरात 5 टन गोमांस जप्त


8 ऑगस्ट रोजी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीने तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीवर कलम 363, 376(1)(ए), 376 (डी), 305 भादवी सहकलम 5(ग), 6 पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.


वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड


सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पूनम पाटील यांनी केला, आरोपी विरुद्ध सबळ साक्षपुरावा उपलब्ध करीत गुन्ह्याचा तपास करीत आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.


सदर खटला सत्र न्यायालयात न्यायाधीश एडी. देव मॅडम यांच्या कोर्टात सुरू होता, आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्यास न्यायालयाने दोन्ही आरोपीना 16 मार्च 2024 रोजी  20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.


सदर गुन्ह्यात आरोपीना शिक्षा ठोठावण्यात सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन व कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार कुंदन वाघमारे व पोलीस स्टेशन नागभीड यांनी मोलाची कामगिरी निभावली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने