Chandrapur Crime News: दुचाकीस्वारांकडून तब्बल 24 लाखांची रोकड जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एकाला अटक

Chandrapur Crime News: दुचाकीस्वारांकडून तब्बल 24 लाखांची रोकड जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एकाला अटक

Chandrapur Crime News चंद्रपूर : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच पक्षानी देशासह राज्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस (Police) यंत्रणा देखील सतर्क होऊन प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. अशातच आता चंद्रपूर पोलिसांच्या (Chandrapur Police) स्थानिक गुन्हे शाखेने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 24 लाख 75 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.

बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर एका व्यक्तीजवळ ही रक्कम आढळून आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी ज्ञानेश्वर रमेश चनदबटवे याला (34, रा. सद्भावना नगर, नागपूर) अटक करण्यात आली असून ही रक्कम नेमकी कुणाची आणि या रक्कमेचा संबंध हवाला अथवा निवडणुकीशी तर नाही ना, याचा शोध सध्या चंद्रपूर पोलीस घेत आहेत.

दुचाकीस्वारांकडून तब्बल 24 लाखांची रोकड जप्त

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गुप्त बातमीदारच्या माध्यमातून माहिती प्राप्त झाली होती की, एक अज्ञात व्यक्ती मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेऊन बल्लारपूरकडून चंद्रपूरकडे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विसापूर टोल नाक्यासमोरील वळणावर सापळा रचत दुचाकीने येणाऱ्या ज्ञानेश्वर चनदबटवे याची अडवणूक केली. दरम्यान त्यांची झडती घेतली असता त्याच्याजवळील एका बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या. या पैशांची विचारणा केली असता त्याने समाधानकार उत्तर न देता अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. परिणामी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एकाला अटक

प्राप्त माहितीनुसार, ही रक्कम पोलिसांनी मोजली असता ती 24 लाख 75 हजारांची असल्याचे स्पष्ट झाले. संशयास्पद पद्धतीने आढळून आलेली ही रोकड ज्ञानेश्वरने चोरी किंवा अवैध मार्गान प्राप्त केल्याचा संशय पोलिसांना असल्याने या प्रकरणी पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वरवर कलम 41 (1) अन्वये गुन्हा दाखल करून ही रोकड ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. सध्या ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, संतोष यलपुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे यांनी मिळून केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करीत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chandrapur Crime: तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं! कौटुंबिक कलहातून पतीने केली चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने