Chandrapur Murder series : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा हत्या

Chandrapur Murder series : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा हत्या

Chandrapur Murder series जिवती - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची दोरीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील करणकोंडी येथे दिनांक ०९ मार्च रोजी सकाळी पहाटे ०३ ते ०३:३०  वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Crime chandrapur       सगुणा अनिल चव्हाण (२६) रा. करणकोंडी असे मृत महिलेचे नाव असून अनिल राम चव्हाण (३०) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिवती पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सगुणा ही मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे पाठविण्यात आले होते आक्रोशपुर्ण व तणावपूर्ण वातावरणात करणकोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक महिलेला 7 वर्षाचा मुलगा व 5 वर्षाची मुलगी आहे. Chandrapur Murder seriesआरोपी अनिल चव्हाण यांचे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करते, शुक्रवारी चव्हाण कुटुंबाने एकत्र जेवण केले, जेवनांनंतर सासू-सासरे बाहेर तर पती-पत्नी व मुले घरात झोपली होती.

मध्यरात्री पती अनिल ने सगुणा चा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली, सगुणा मृत झाल्याचे समजताच अनिल ने तिथून पळ काढला. Chandrapur Murder series


      फिर्यादी राजकुमार रावण राठोड (३०) रा. घारपाणा यांनी पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची तक्रार जिवती पोलिसात दिल्यावरून अनिल राम चव्हाण यांचे विरुद्ध अपक्र ३५/२०२४ भादवी कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेनंतर जिवती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सुद्धा जिवती मध्ये पोहचले आरोपीला तात्काळ अटक करावी असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिल्यावर पोलिसांनी तपासाला गती दिली.


शनिवारी रात्री च्या सुमारास आरोपी अनिल चव्हाण हा करणकोंडी च्या जंगलात लपून बसला होता पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत अटक केली.अशी आली घटना उघडकीस


सकाळी मुले व सासू सासऱ्याला जाग आल्यावर त्यांनी सुन सगुणा ला आवाज दिला मात्र काही प्रतिसाद न मिळाल्याने मुलाने आईला उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती हालचाल करीत नव्हती, सासू ने आत येऊन बघितले तर सगुणा हालचाल करीत नव्हती, घरी सासू व मुलांनी रडणे सुरू केले, शेजाऱ्यांना याबाबत कळताच त्यांनी चव्हाण यांचे घर गाठले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस पाटील राठोड यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली.


आरोपी अनिल हा नेहमी सगुणा च्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यावरून अनेकदा दोघांचे नेहमी वाद व्हायचे, या कारणातून ही हत्या झाली. पती-पत्नीच्या वादात 2 मुले पोरकी झाली.


चंद्रपूर जिल्ह्यात नव्या वर्षांपासून सुरू झालेले हत्येचे सत्र आजही सुरूच आहे, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 14 हत्या झाल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने