Local crime news : त्या संशयामुळे तुळजाबाई ची हत्या

Local crime news : त्या संशयामुळे तुळजाबाई ची हत्या

Local crime news व्यसनाधिनतेमुळे पत्नीवर संशय घेण्याऱ्या पतीने तेंदूपत्ता तोडून घरी येत असलेल्या पत्नीवर गावाशेजारी धारधार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना रविवारी (26 मे) ला सकाळी अकराच्या सुमारास राजुरा तालुक्यातील तुलाणा गावात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तुळजाबाई अनिल सेलूरकर असे मृतक पत्नीचे नाव आहे. पोलिस ठाण्यात शरण आलेला पती अनिल सेलूरकरला पोलिसांनी अटक केली आहे. 

Local crime      Local crime news राजूरा तालुक्यातील तुलाणा निवासी अनिल सेलूरकर हा टेलरिंग कारागीर असून त्याला दोन अपत्य आहेत. पती पत्नीमध्ये सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूचं लागले आणि संसराची वाताहात झाली. व्यसनाधिनतेमुळेच दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. तो पत्नीवर संशय घेत असल्यामुळे भांडण व्हायचे. सध्या तेंदूपत्ता हंगाम असल्याने पत्नी तुळजाबाई रविवारी सकाळी गावातील काही महिलांसोबत तेंदुपाने तोडण्यासाठी जंगलात गेली होती. संशयखोर पतीने आज सकाळी पत्नीला जिवेनिशी मारण्यासाठी जंगलाच्या रस्त्यावर शस्त्र घेऊन बसला होता. पत्नी तेंदूपत्ता घेऊन येत असताना गावाजवळच तिच्यासोबत पती काही अंतर चालून आला. त्यानंतर संधी साधून त्याने पत्नीवर रत्यावरच पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून ठार केले. यावेळी गावातील एक महिला तिच्यासोबत होती. हा सर्व प्रकार तिच्यासमारेच झाल्याने पतीने त्या महिलेलाही मारण्याचा प्रयत्न केला. ती महिला जिव वाचवून गावात पळत सुटली. हा सगळ प्रकार तिने गावात सांगितला. Local crime news काही नागरिक तिच्या मदतीला धावून आल्याने तिचा जीव वाचला. गावक-यांनी लगेच विरुर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी अनिल सेलुरकर पत्नीची हत्या करून विरुर पोलीस ठाण्यात शरण आला. पोलिसांनी घटनेचा गुन्हा त्यालया अटक केली आहे. ठाणेदार संतोष वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड हे या घटनेचा तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने