चंद्रपुरात तब्बल 19 लाख 80 हजाराचे मॅफेड्रोन जप्त

चंद्रपुरात तब्बल 19 लाख 80 हजाराचे मॅफेड्रोन जप्त

Chandrapur drug paddler

चंद्रपूर - राज्यात सध्या ड्रग्ज तस्कर ललित पाटील यांचं प्रकरण ताजे असताना चंद्रपुरात सुद्धा अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून आरोपिकडून तब्बल 19 लाख 80 हजार रुपये किमतीचे मॅफेड्रोन MD ताब्यात घेतले आहे.

Chandrapur drug paddler



30 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम हे ड्रग्ज पावडर चंद्रपुरात विक्री करण्यासाठी नागपूर वरून येत आहे, याबाबत पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी याबाबत संपूर्ण माहिती वरिष्ठांना देत पडोली चौकात सापळा रचला.



काही वेळात पडोली चौक येथे चारचाकी वाहन क्रमांक MH34BR5951 या वाहनाला थांबविण्यात आले, वाहनाची झडती घेतली असता एका थैलीत पांढऱ्या रंगाचे पावडर मॅफेड्रोन 198 ग्राम आढळून आले. सोबतच वाहनात असलेली तलवार सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली.



स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी 28 वर्षीय शाहरुख मतलबु खान व 28 वर्षीय साहिल इजराईल शेख दोघेही राहणार शालीकग्राम घुग्घुस यांना ताब्यात घेण्यात आले.


मॅफेड्रोन ची किंमत 19 लाख 80 हजार असा एकूण 28 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.

पोलिसांनी दोन्ही आरोपीवर कलम 8(क)21 (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 4, 25 शस्त्र अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि नागेश चतरकर, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भूषण बारसिंगे व सायबर सेल चे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने