चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करांवर कारवाई

चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करांवर कारवाई

Chandrapur cattle smuggling

चंद्रपूर - 1 नोव्हेम्बरला जिल्ह्यातील चिंचपल्ली येथे गोवंश तस्कर जनावरांची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता सदर कारवाई 14 गोवंशाची सुटका करीत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Chandrapur cattle smuggle


जिल्ह्यातील गोवंश तस्करांवर आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते, निर्देश प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करीत गोवंश तस्करांच्या हालचालीवर नजर ठेवली, 1 नोव्हेम्बरला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली.


माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचपल्ली येथील बस स्टॉप जवळ सापळा रचला असता 1 दुचाकी व चारचाकी वाहन क्रमांक MH20D4653 हे वाहन थांबवित विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मागून काही अंतरावर गोवंशाची वाहतूक करणारे वाहन येत आहे, सदर दोन्ही वाहने हे पेट्रोलिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले.


पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी करीत पीकअप वाहन क्रमांक AP39US5572 दिसून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असता त्या वाहनात निर्दयीपणे गोवंश जनावर कोंबलेल्या अवस्थेत होते, 14 गोवंश जनावरांची सुटका करीत त्यांना प्यार फाऊंडेशन दाताला येथे पोहचविण्यात आले.


सदर गुन्ह्यात आरोपी 26 वर्षीय वसीम रज्जाक कुरेशी रा.रयतवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, 29 वर्षीय शाहबाज रशीद खान जलनगर, 28 वर्षीय संतोष बुद्धीलाल कोरी रा.रयतवारी, 20 वर्षीय सोहेल अहमद शेख रा. असिफाबाद तेलंगणा यांच्यावर पोलीस स्टेशन रामनगर येथे प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.


आरोपिकडून एकूण 13 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, सुरेंद्र महतो, संतोश येलपुलवार, गोपाल आतकुलवार, दीपक डोंगर, गणेश मोहूर्ले, गणेश भोयर, प्रदीप मडावी, गोपीनाथ नरोटे व दिनेश अराडे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने