रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीसांनी पकडला

रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीसांनी पकडला

Chandrapur sand mafia news


(प्रशांत गेडाम)
तळोधी (बा.) -  बोकडडोह नाल्यातून रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाढोणा परिसरात पोलिसांनी जप्त केला. Chandrapur sand mafia


तळोधी बा. पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी वाढोणा परिसरातील गावात रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रेती भरलेला ट्रॅक्टर (एमएच ३४ बीजी ०६९८) आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता चालकाकडे कुठल्याही प्रकारचा रेती परवाना नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी अवैध रेती व ट्रॅक्टर असा ३ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी संजय चुन्नीराम गहाने (४६) याच्याविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तळोधी बा. पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाकर देहारे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने