Sand smuggling in chandrapur : ठाणेदाराची फिल्मी स्टाईल कारवाई

Sand smuggling in chandrapur : ठाणेदाराची फिल्मी स्टाईल कारवाई

 Sand smuggling in chandrapur मूल : मागील एक दीड वर्षापासून मुल तालुक्यात रेती घाटाचे लिलाव प्रक्रिया झाली नसल्याने अनेक कर्मचारी,नागरिक आणि घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. अनेक नागरिकांना अधिकच्या दराने रेती खरेदी करून बांधकाम पूर्ण करावे लागत आहे. अधिक पैशाची संधी साधून तालुक्यातील रेती तस्करी करणारे रात्रीच्या वेळेला आर्थिक लोभापायी आपली झोप मोडून मूलच्या भेजगाव नदी घाटातून अवैधरीत्या ट्रॅक्टरच्या  साह्याने रेतीची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांना होताच रेती तस्करी करणारे ओळखले नाही पाहिजे म्हणून स्वतःच्या दुचाकीने डोक्याला टॉवेलचां फेटा गुंडाळून कुणालाही याची माहिती होऊ न देता ट्रॅक्टरचा पाठलाग करून रात्री अखेर दोन ट्रॅक्टर  रंगेहाथ पकडले. 


Sand smuggling



ही कारवाई महसूल तालुका प्रशासनाचे करायला पाहिजे परंतु तालुका प्रशासन माञ कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतल्याने मुल पोलिस प्रशासनाला जागून ही कारवाई करावी लागली. दोन ट्रॅक्टर सापडल्याने रेती तस्करी करणारे अनिल बालाजी भोयर (२६) रा. भेजगाव, किरण बाळा चटारे (३२) रा. बेंबाळ अशी आरोपींची नावे असुन दोघांवरही मूल पोलिसांनी कलम ३७९,५११, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sand smuggling in chandrapur



       रेतीचा लिलाव न झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे वाजवी पेक्षा जास्त किंमत देवुन रेती विकत घेण्याचा सपाटा कंत्राटदार करीत आहेत. हीच संधी साधत अनेक रेती तस्कर सक्रिय झाले असुन रात्रीच्या वेळेस मूल तालुक्यातील चारही बाजूंनी वाहणाऱ्या उमा नदी पात्रातून रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात आहे.


यासंदर्भात तालुका प्रशासनातील पथकाला माहिती असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. असेही होऊ शकते रेती तस्कर मोठे हुशार असल्याने त्याच पथकातील कर्मचाऱ्यांना लालीपॉप दाखवुन आपले काम करीत असावे अशी चर्चा सुरू झाली आहे. म्हणून महसूल प्रशासन लक्ष घालीत नसल्याने थेट १५ मार्च रोजी मुल पोलिसांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांचे सोंग करुन ही कारवाई केल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. Sand smuggling in chandrapur



                चारचाकी पोलिसांचे वाहन घेऊन गेलो तर रेती तस्कर सापडणार नाही हे गृहीत धरून मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांनी डोक्याला टॉवेल गुंडाळून दुचाकीने रेती तस्करांच्या मागावर सकाळी 8 वाजुन १० मिनिटांनी उमा नदिघाटावर गेले.  Sand smuggling in chandrapur


काही वेळातच पोलिस आल्याची खात्री होताच ट्रॅक्टर मधील रेती जागेवरच उलटवून पसार होण्याच्या बेतात असताना मोठया शिताफीने दोन्ही ट्रॅक्टरचे ड्रायव्हरांना पकडुन त्यांना ताब्यात घेतले. व त्यांचेवर वरील कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. यावेळी मूल पोलिसांनी एक जुना वापरता महिंद्रा ट्रॅक्टर क. एमएच ४० सी एच २४९७, व ट्रॉली एम एच ३४एल ५११९ तसेच दुसरा न्यु हॉलंड ३२३० कंपनी असा एकूण १० लाख ८०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत असुन अवैध्य रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने